नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे / प्रतिनिधी – सणासुदीच्या दिवसात लोक आपापल्या दूर गावी उत्सवासाठी तात्पुरत्या कालावधीसाठी स्थलांतर करत असतात. अशा बंद घराचा शोध घेवून घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. अशीच घटना धुळे येथे घडली आहे. धुळे शहरात सध्या चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असताना आझादनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांचा तपास पोलिसांनी लावला असून दोघा संशयीतांकडून हजारोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलिसानी दिलेल्या माहिती नुसार आझादनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनमाड जीन मधील बंद घरातून अज्ञात चोरांनी १७ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिणे व तीस हजाराची रक्कम लांबविली होती. याप्रकरणी आझाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. याच भागातील रामदेव बाबा नगर मधील बंद घराचे कुलूप तोडून चोरांनी १० हजाराची रोख रक्कम १९ हजार ६०० रुपये किंमतीचे – सोने चांदीचे दागिणे असा २९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.
याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी या घटनेचा तपास सुरु केला गुप्त माहिती मिळताच त्यानी मोठ्या शिताफीने सर्व आरोपीना ताब्यात घेतले. त्यांच्या कडून सुमारे ५२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात सोने चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक संजय बारकुंड , अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली.