महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ठाणे लोकप्रिय बातम्या

टीएमसी च्या सर्व प्रभागामध्ये चाचणी केंद्र,अँटीजन किटसच्या माध्यमातून होणार तपासणी

प्रतिनिधी.

ठाणे – अँटीजन किटसच्या माध्यमातून चाचणी करण्यासाठी येत्या शुक्रवारपर्यंत सर्व प्रभाग समित्यांमध्ये टेस्टींग सेंटर्सचे नियोजन करून सोमवारपासून या सर्व ठिकाणी चाचणी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे.या संदर्भात त्यांनी आज परिमंडळ उप आयुक्त तसेच सर्व प्रभागांचे सहाय्यक आयुक्त यांची बैठक घेवून अँटीजन किटसच्या माध्यमातून चाचणी करण्यासाठी कोणत्या प्रकारची यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता आहे याविषयीच्या सूचना दिल्या.सद्यस्थितीत चार ठिकाणी ही सेंटर्स कार्यान्वित करण्यात आली असून येत्या शुक्रवारपर्यंत सर्व प्रभाग समितीमध्ये ही सेंटर्स सुरू करण्याबाबत नियोजन करून ती सेंटर्स तेथील फिव्हर ओपीडीसी संलग्न करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.दरम्यान चाचणीचा अहवालानुसार बाधित रूग्णास वैद्यकीय अधिका-यांच्या अभिप्रायानुसार त्यास कुठे दाखल करायचे आहे याचा निर्णय घेण्यात येणार असून त्यानुषंगाने आवश्यक ती सर्व कार्यवाही प्रभाग समिती स्तरावर करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी परिमंडळ उप आयुक्त आणि सर्व सहाय्यक आयुक्त यांना दिल्या.

केवळ लक्षणे असणा-यांचीच चाचणी

कोवीड १९ रॅपिड अँटीजन किटसच्या माध्यमातून सरसकट चाचणी करण्यात येणार नसून आयसीएमआरच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार ज्यांना लक्षणे आहेत त्यांचीच चाचणी अँटीजन किटसच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


Translate »
×