नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापूर / प्रतीनिधी – महाराष्ट्रभर गणेशोत्सावानिमित्त आरतीचे स्वर ऐकू येत आहेत. मोठ्या उत्साहात बाप्पा विराजमान झाले आहेत. घरगुती व सार्वजनिक गणपती सजावटीच्या स्पर्धा देखील जाहीर झाल्या आहेत. या धामधुमीत आपला बाप्पा त्याची मूर्ती इतर मूर्तीपेक्षा कशी वेगळी वैशिष्टपूर्ण असेल याकडे देखील कार्यकर्ते भाविकांचे बारकाईने लक्ष असते. त्यामुळे मूर्ती खरेदी करताना जातधर्माच्या बेड्या बाजूला सारत हरहुन्नरी मुर्तीकाराकडून मूर्ती खरेदीचा भाविकांचा कल असतो. अन त्याच उत्साहाने सोलापूर येथे गेले २० वर्ष जातीय राजकरणाचा विचार न करता केवळ एक मूर्ती कारागीर म्हणून गणेश मूर्तीच्या माध्यमातून आपली कला सादर करण्याचे काम मूर्तिकार मौलाअली जाफर शेख हा मुस्लीम धर्मीय युवक करत आहे.
धार्मिक राजकरणाच्या खेळीला बळी न पडता केवळ माणूस म्हणून जगण्याचा मौलाअली याचा हा प्रवास शालेय जीवनापासून सुरु झाला होता. समाजात जातीय सलोखा टिकून राहण्यासाठी पुढाकार घेत या कामाची सुरुवात केले असल्याची माहिती मौलाअली यांनी दिली आहे. समाजामध्ये वाढत चाललेला द्वेष, जातीय तेढ संपुष्टात येण्यासाठी धर्माची मर्यादा ओलांडत मुस्लिम मूर्तिकाराने गेल्या वीस वर्षांपासून गणपती बाप्पा साकारण्याचे काम हाती घेतले आहे.मौलाअली जाफर शेख यांनी एक अनोख्या पद्धतीने बाप्पा चरणी आपली सेवा अर्पण केली आहे.या कलेच्या माध्यमातून मूर्तिकार मौलाअली यांनी जातीपातीच्या भिंती पाडण्याची जे कार्य सुरु ठेवले आहे ते इतरांना नक्कीच प्रेरणादायी असेल.