नेशन न्यूज मराठी टीम.
नांदेड / प्रतिनिधी – फुले -शाहू-आंबेडकर विद्यार्थी कृर्ती समितीच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले.यात डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 20-21 मध्ये काही विद्यार्थ्यांना एकच हप्ता मिळाला आहे.
यावेळी सन 21-22 व 22-23 या शैक्षणिक वर्षात प्रलंबित रक्कम विद्यार्थ्यांना तात्काळ देण्यात यावी, भारत सरकार शिष्यवृत्ती रक्कमेत महागाई भत्ता नुसार वाढ करण्यात यावी ,डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची तालुका स्तरावर तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी ,स्वाधार योजनेची 50 टक्के जाचक अट रद्द करण्यात यावी ,भारत सरकार शिष्यवृत्तीचे हे शैक्षणिक वर्ष संपण्या पूर्वी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी ,भारत सरकार शिष्यवृत्ती अभावी महाविद्यालया कडून विद्यार्थ्यांचे शैक्षणीक कागद पत्रे साठी अडवणूक केली जात आहे यावर आळा घालावा. अशा विविध मागण्या यावेळी विद्यार्थ्याकडून मांडण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.