नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव / प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्य वक्तव्य करणाऱ्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावात ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करून गोपीचंद पडळकर यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी जोरदार घोषणाबाजी केली गेली.गोपीचंद पडळकर यांची पवार कुटुंबावर बोलण्याची लायकी नाही, पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांनी सोडलेल कुत्र आहे, आता तरी अजित दादांनी भाजपा बरोबर असलेल्या सत्तेतून बाहेर पडावं.अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आल्या.