नेशन न्यूज मराठी टीम.
नांदेड / प्रतिनिधी – मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. या आरक्षणाच्या प्रश्नाची तेढ सोडवण्यासाठी शासनाने ओबीसी प्रमाणपत्र सरसकट मराठा समाजाला द्यावे असे मनोज यांनी सुचविले होते, याला ओबोसी समाज बांधवांनी निदर्शने करत ओबीसी आरक्षण टक्क्याला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या असे म्हटले होते.
परंतु मराठा समाजाला ओबीसी आरक्षणा मधूनच आरक्षण देण्यात यावे यासाठी पिंपरी महिपाल या ग्रामपंचायतीने मतदानावर बहिष्कार टाकला आहे, तसेच राजकीय पुढार्यांना गाव बंदी घातली आहे. तरी सरकारने मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊन पुढे होणाऱ्या दुर्घटना थांबवाव्या अशी देखील विनंती यावेळी करण्यात आली आहे.