नेशन न्यूज मराठी टीम.
जालना / प्रतिनिधी – जालना येथे सुरु झालेल्या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चा ठिकठिकाणी पाठिंबा देण्यासाठी निदर्शने करीत आहे. त्याप्रमाणे मराठा समाज व्यतिरिक समाज बांधव देखील आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यभरात आंदोलन व साखळी उपोषण करत आहे.
त्याच पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भोकरदन तालुक्यात सुद्धा सुमारे 600 ते 700 ट्रॅक्टर्स रॅली काढत मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली.या रॅलीत भोकरदन सकल समाज बौद्ध बांधवांकडून मराठा समाजाच्या आरक्षणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी शेकडो समाज बांधवांनी रॅलीमध्ये उपस्थिती दाखवली आहे.