नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अनेकजण सज्ज झाले आहेत.अशातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले असून कल्याण मध्ये येणाऱ्या जड-अवजड वाहनांना शहरा अंतर्गत मार्गावरून प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
कल्याण मध्ये येणाऱ्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक बसेसचेही मार्ग बदलण्यात आले आहेत. तर अनेक रस्त्यांवर वाहनासाठी नो पार्कींग झोन तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती कल्याण पश्चिम चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी दिली.
Related Posts