नेशन न्यूज मराठी टीम.
नंदुरबार / प्रतिनिधी – गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या तिघी राज्यांना जोडण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या सारंगखेडा येथील तापी नदीवर असलेला ब्रिटिश कालीन पुलाला मोठं भगदाड पडले असून पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 126 वरील सारंगखेडा येथील तापी नदीवरील ब्रिटिश कालीन पूल खचला असून बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे पूल खचला आहे. यामुळे परिसरातील शंभर गावांचा संपर्क तुटला असून जिल्हा मुख्यालय जाण्यासाठी जवळपास शंभर किलोमीटरचा फेरा मारून गाव कऱ्यांना जावे लागत आहे, त्यासोबत या गावांमधील वैद्यकीय सेवा आणि अत्यावश्यक सेवा ही प्रभावित होणार आहेत जिल्हा प्रशासनाने या पुलाची दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून त्यावर गुन्हा दाखल करावा ही मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
या पुलाच्या दुरुस्ती कामाची चौकशी करण्यात यावी तसेच या महत्वपूर्ण मार्गावरील कामांकडे दुर्लक्ष करणारे अभियंत्यांवर कारवाई करावी अशी अपेक्षा विविध पक्ष्याच्या नेत्या कडून व्यक्त केली जाते.