नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील आदिवासी बांधव तसेच इतर रहिवासी नागरिक अजूनही आरोग्य, शिक्षण, पाणी,अशा विविध मूलभूत अधिकारांपासून वंचित आहेत. आजही मेळघाटात कुपोषणामुळे बालमृत्यू होत आहेत. परंतु तरीही शासन स्तरावर उपाय योजना करण्यात येत नाहीत. त्यामुळे मेळघाटातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज सामाजिक संघटना व स्थानिक रहिवासी नागरिकांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
मेळघाटातील कुपोषणामुळे 1993 मध्ये 1 हजारांपेक्षा जास्त बालमृत्यू मेळघाटात झाले होते. तेव्हापासून अनेक राजकीय नेत्यांनी तसेच त्यांच्या पक्षांनी मेळघाटमध्ये भेटी देत कुपोषण मुक्तीसाठी अनेक आश्वासने दिली होती. परंतु अजूनही मेळघाट कुपोषण मुक्त झाला नाही. तसेच येथील शिक्षणाचा प्रश्नही गंभीर आहे या बाबींसाठी धरणे आंदोलन करण्यात आले असल्याचे सरपंचांनी सांगितले.