नेशन न्यूज मराठी टीम.
जळगाव / प्रतिनिधी – शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यभरात होऊ द्या चर्चा हे अभियान राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातही ऑक्टोबर महिन्यात होवू द्या चर्चा ह्या अभियान राबविण्यात येणार असून या पार्श्वभूमीवर आज जळगावात शिवसेना ठाकरे गटाची बैठक पार पडली.
शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 1 ऑक्टोंबर ते १२ ऑक्टोंबर दरम्यान संपूर्ण जळगाव जिल्ह्यात दोन टप्प्यात गाव पातळीवर हे होवू द्या चर्चा हे अभियान राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांना योग्यत्या सूचना करण्यात आल्या.