नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – हरियाणा नूह येथील दंगल प्रकरणी काँग्रेसचे आमदार मम्मन खान यांना अटक करण्यात आली आहे. यावर वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद म्हणाले की, नूहमध्ये हिंसाचार प्रकरणी काँग्रेसचे आमदार यांना आज अटक झाली. या प्रकरणी बोलण्यासाठी कोणताही कॉंग्रेसचा पुढारी समोर येण्यास तयार नाहीये.
छोट्या – छोट्या गोष्टींसाठी ट्विट करणारे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे आता बोलायला सुद्धा नाहीत. हा प्रश्न फक्त नूहचा नसून महाराष्ट्रातही अशाप्रकारे अल्पसंख्यांकांना टार्गेट केल जात आहे. अवघड काळात नेहमी काँग्रेसच्या बाजूने उभे राहणाऱ्या मुस्लिमांनी तुमच्याकडून काय अपेक्षा करायची आहे?
काँग्रेस कोणत्या इंडियाची गोष्ट करत आहे? कोणता भारत जोडो करत आहे? लोक मारले जात आहेत, त्यांना सन्मानाने जगण्याच्या बाबतीत, त्यांच्या संविधानिक अधिकारासाठी बोलायला काँग्रेस गप्प का? काँग्रेसच्या अवघड काळात मुस्लिम साथ देतात पण, काँग्रेस जर अशा काळात मुस्लीम समाजासोबत नसेल तर त्यांनी तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवावी. असे म्हणत त्यांनी या प्रकरणावर काँग्रेसच्या मुस्लिमांप्रती भूमिकेवर टीका केली. व राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे.