नेशन न्यूज मराठी टिम.
कल्याण/प्रतिनिधी– २०१९ साली कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपाचा महापौर होणार हे ठरलं होतं, मात्र गडबड सगळी मातोश्री वरून होतं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी मला सांगितलं.भाजपचा महापौर व्हावा अशी शिंदे यांची इच्छा होती.मात्र मातोश्रीवरून सांगितलं की भाजपाचा महापौर नको आणि त्यामुळे २०१९ साली भाजपाचा महापौर झाला नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्दाला जागणारे आहेत, त्यामुळे शिवसेना भारतीय जनता पार्टीमध्ये यावेळेस महापौर हा भाजपाचाच होणार असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ रवींद्र चव्हाण यांनी बोलून दाखवला.कल्याणमध्ये भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,त्यात मंत्री चव्हाण यांनी हा विश्वात व्यक्त केला.