नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – भाजप-काँग्रेस दोघांनाही भारतातील दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिमांची पर्वा नाही, अशी गंभीर टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
त्यांनी ट्वीट करत देशातील दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम यांना सावध करत म्हणाले की, तुमच्या एका बाजूला जातीयवादी भाजप-आरएसएस आहे. जे एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात, द्वेष पसरवण्यात, जातीयवादाचे विष पसरवण्यात आणि मृत्यूच्या ठेकेदाराचा वाढदिवस साजरा करण्यात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे लाचार काँग्रेस पक्ष आहे. जो मतांच्या जोगव्यासाठी “मोहब्बत की दुकान” म्हणत खुळखुळा वाजवत आहे.
परंतु, आमचे काय? आमच्या परिस्थीतीमध्ये काही बदल झालेले आहे का? आम्ही ह्या भारतातील दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम सतत कलंक, भेदभाव आणि हिंसाचाराचे, अत्याचारानेग्रस्त असलेले बहिष्कृत जीवन जगत आहोत आणि आपल्या स्त्रिया जगातील सर्वात अत्याचार पीडित महिला आहेत.
भाजप-आरएसएस आणि काँग्रेस या दोघांनाही भारतातील दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिमांची पर्वा नाही. त्यांना सत्ता वाटून घ्यायची नाहीये, तर सर्व सत्ता फक्त आपल्यातच ठेवायची आहे. असा हल्लाबोल त्यांनी भाजप-कॉंग्रेस पक्षावर केला.