नेशन न्यूज मराठी टीम.
यवतमाळ / प्रतिनिधी – बंदुकीच्या धाकावर पाच लाखाच्या खंडणीची मागणी करण्यात आली. ही घटना मारेगाव तालुक्यातील कोसारा शिवारात घडल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली.
बंदुकीच्या धाकावर धमकाविल्याची तक्रार तक्रारदाराने दिली. तक्रारदार आपल्या कामगारासह कोसारा शिवारात उभा असताना आरोपी आपल्या एक अन्य साथीदारासह कारने आला. मला वाळू घाटाचा हप्ता दिला नाही. असे म्हणत बंदूक तक्रारदाराच्या डोक्याला लावली. तर, दुसर्या साथीदाराने चाकू पोटाला लावला. याप्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली गेली. त्यावरून विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.