नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/ संघर्ष गांगुर्डे– देशातील अग्रगण्य बहुराज्यीय शेड्युल्ड सहकारी बँक असलेल्या कल्याण जनता सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनंत कुलकर्णी यांची नुकतीच निवड करण्यात आली. बँकेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळ सभेत अध्यक्ष सीए सचिन आंबेकर यांनी ही घोषणा केली. गेली १२ वर्षे अनंत कुलकर्णी या बँकेत असून गेले एक वर्ष सरव्यवस्थापक पदावर होते.
अनंत कुलकर्णी गेली ४१ वर्षे सहकारी बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. बँकिंगमधील तज्ञ व अनुभवी असलेल्या अनंत कुलकर्णी यांनी यापूर्वी राजगुरुनगर सहकारी बँक, जनसेवा सहकारी बँक पुणे, श्रीशारदा सहकारी बँकेत वरिष्ठ अधिकारी पदांवर काम केले आहे. उत्तम व्याख्याते आणि प्रशिक्षक म्हणून देखील त्यांचा लौकिक आहे.
सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या कल्याण जनता बँकेचा एकूण व्यवसाय रू. ५४०० कोटींचा असून ६० हजारांहून अधिक सभासद संख्या आहे तर महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात एकूण ४३ शाखा कार्यरत आहेत.