नेशन न्यूज मराठी टीम.
यवतमाळ / प्रतिनिधी – यवतमाळच्या पांढरकवडा जवळील राष्ट्रीय महामार्गावरून नागपूरच्या दिशेने माचिसचे गट्ठे घेऊन जाणाऱ्या ट्रकने अचानक पेट घेतल्यामुळे ट्रकसह ट्रकमधील माचिसचे गट्ठे जळून भस्मतात झाले.या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
ट्रक हा उत्तर प्रदेशातील नेवारी या गावाकडे जात होता. दरम्यान महामार्गावरील खातारा ते सिंगलदीप या गावा नजिक रस्त्यावर थांबून असलेल्या एका ट्रकला घर्षण करून हा भरधाव ट्रक समोर गेला. ट्रकमध्ये भरून असलेल्या माचिसच्या डब्यांचे घर्षण झाल्यामुळे ठिणग्या पडून माचिसच्या गठ्ठयांनी अचानक पेट घेतला.यात ट्रक पूर्ण जळून खाक झाला.