नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ज्या अभियंतानी मुंबई गोवा महामार्गचं काम केलं त्यांचा सत्कार सरकार मार्फत केला गेला. कार्यक्रमात राज्याचे बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते. त्यावेळी मनसे चे संदीप देशपांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सभागृहाच्या गेटवर काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी संदीप यांनी सरकारच्या या भूमिकेबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. रवींद्र चव्हाण हे खोटारडे मंत्री आहेत. त्यांची मंत्रीपदावर राहण्याची लायकी नाही त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तसेच सत्कार स्वीकारणाऱ्या बाबत म्हणाले कि, या अभियंतानी लाज बाळगावी व तो सत्कार परत करावा ही विनंती नाहीतर आम्ही मनसेच्या पद्धतीने त्यांचा सत्कार करू असा इशारा त्यावेळी त्यानी दिला.
अजूनही मुंबई गोवा महामार्ग हा खड्डेमुक्त नाही. सगळे खड्डे अजूनही त्या महामार्गावर आहेत. चॅनेलच्या प्रतिनिधीनी रिऍलिटी चेक केला त्यात खड्डे किती आहे सिंगल लेन झाली का ? हे समोर आलं. एक लेन कुठे झाली ? हे दाखवा असा सवाल करत सरकार नुसते खोटारडे आश्वासन देतात. असे मत देशपांडे यांनी मांडले.