नेशन न्यूज मराठी टीम.
यवतमाळ / प्रतिनिधी – एकतर्फी प्रेमातून हत्येच्या घटना त्यातील क्रूरता बऱ्याचदा ऐकतो. पण पतीनेच कायद्याने पत्नी असलेल्या महिलेची आपल्या दुसऱ्या पत्नीच्या प्रेमासाठी हत्या केली आहे. दुसऱ्या पत्नीवर केल्या जाणाऱ्या प्रेमाला विरोध करणाऱ्या पहिल्या पत्नीचा पतीने गळा आवळून खू-न केला आहे. त्यानंतर तिचे प्रेत गीट्टी खाणीच्या खड्ड्यात फेकून दिले. या प्रकरणात शिरपूर पोलिसांनी संशयित आरोपीला दिल्लीतून ताब्यात घेतले आहे.
शिरपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहदा येथील गिट्टी खाणीच्या खड्ड्यातील पाण्यात एका महिलेचे प्रेत आढळून आले होते. घटनेपासूनच तिचा आरोपी पती हा मोहदा येथून फरार होता. तो दिल्लीत असल्याची गोपनीय माहिती मिळताच, शिरपुरचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनात त्याला अटक करण्यात आली आहे.