नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली / प्रतिनिधी – सण- उत्सव आणि डोंबिवली हे वेगळच समीकरण महाराष्ट्रात प्रचलित आहे. नेहमीच उत्सव सणांमध्ये एक वेगळा सामाजिक संदेश दिला जातो. यावर्षीच्या गणेशोत्सवात एचएससी कडून डोंबिवलीच्या आनंद बालभवनात भरवण्यात आलेल्या अगरबत्ती महोत्सवात ‘ पर्यावरण वाचवा’ असा संदेश देण्यात देण्यात आलेला आहे. ‘ भारतीय व नैसगिक बनावटीच्या सुगंधी उत्पादनाच्या अगरबत्ती गणेशोत्सवात वापरा. केमिकल युक्त अशा अगरबत्ती वापरू नका’ असा या उत्सवाच्या मागील उद्देश असल्याचे एचबीसीचे नारायण वैद्य यांनी सांगितले.
या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सुमारे अडीच लाख अगरबत्त्यांनी बनविलेला गणपती भक्तांना पाहता यावा याकरता प्रदर्शित केला आहे. चांगली अगरबत्ती लावून तुम्ही पर्यावरणाला एक चांगला हातभार लावा असे उत्सवानिमित्त असण्याचा प्रयत्न केला आहे. या उत्सवात अनेक भक्तगण अगरबत्ती घेण्यासाठी आले असता त्यांनाही हा सामाजिक संदेश पटला आहे. अगरबत्ती महोत्सव 17 सप्टेंबर पर्यंत डोंबिवलीकरांसाठी खुला आहे.