नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे / प्रतिनिधी – सरपंचांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी धुळे तालुका सरपंच संघटनेने आज धुळे पंचायत समितीत डफ वाजवून पंचायत समितीत प्रशासनाचा निषेध करत आंदोलन करण्यात आले. रोजगार हमी योजनेतील सिंचन विहिरी व गाय गोठ्यांचा समावेश करा, ड यादीतील लाभार्थ्यांना घरकुल देण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली.
धुळे पंचायत समितीने मागील चार वर्षापासून रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर व गाय गोठा योजनेचा लाभ देणे बंद केले आहे. ही योजना सुरू करावी अशी मागणी सरपंच संघटनेने केली आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धुळे तालुका सरपंच संघटनेने पंचायत समितीत डफ बजाव आंदोलन केले आहे.
रोजगार हमी योजनेअंतर्गत या सिंचन विहीर व गाय गोठा चा समावेश केल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच ग्रामपंचायतच्या ड यादीतील लाभार्थ्यांना घरकुल मिळत नसल्याने त्यांच्यावर अन्याय होतो आहे. तसेच ‘ड’ यादीतील लाभार्थ्यांनाही घरकुल द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी धुळे तालुक्यातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.