नेशन न्यूज मराठी टीम.
बुलढाणा / प्रतिनिधी – मराठा समाज आरक्षण संदर्भात जालन्यात उपोषण सुरु झाल्यापासून मराठा समाज ठिकठिकाणी मोर्च्याला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुलढाण्यात देखील सकल मराठा क्रांती मोर्चाने भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते..
सकल मराठा क्रांती मोर्चा बुलढाण्यातील जिजामाता प्रेक्षागार येथून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये हजारो मराठा बांधव मोर्चामध्ये सहभागी झाले होते. तर राज्य सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करुन आमदार खासदारांच्या घरावर मोर्चे काढू, असा इशारा मराठा बांधवांनी दिला आहे.