नेशन न्यूज मराठी टीम.
बुलढाणा / प्रतिनिधी – जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांवर लाठी चार्ज केला नसल्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जरी म्हणत असले तरी लाठीहल्ला झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असं मत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केल आहे.
यावेळी अनेक ज्या अनपेक्षित घटना या आधी घडलेल्या आहेत त्या घटनांची अनेक मंत्र्यांनी जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची आठवणही एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना करून दिली आहे. या राज्य सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाहीये. त्यांना केवळ राजकारण करायचं आहे असेही मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. बुलढाणा येथे सुरू असलेल्या उपोषण मंडपाला भेट देत यावेळी खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.