नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक/ प्रतिनिधी – बळीराजाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व असलेला पोळ्याचा सण दोन दिवसावर येऊन ठेपला असून आज येवल्यातील आठवडे बाजार असल्याने सर्जा-राजाला सजवण्यासाठी विविध साहित्याची आवश्यकता असते.मात्र पावसाने सध्या पाठ फिरवल्याने शेतकऱ्याची परिस्थिती बिकट आहे, वाढलेली महागाई त्यामुळे शेतकरी खुप कमी प्रमाणात खरेदी करत आहेत.
बैलांना सजविण्यासाठी लागणारे गोंडे, घुंगरू,वेसण, घुंगरमाळा, कवड्यांच्या माळा,कलर असे विविध साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे.मात्र बळीराजाने या साहित्य खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.
Related Posts