नेशन न्यूज मराठी टीम.
भंडारा / प्रतिनिधी – नाना पटोले यांच्या नेतृत्वात आज भंडारा शहरात कॉंग्रेसची जनसंवाद यात्रा काढण्यात आली. यावेळी भंडारा शहरातुन मुख्य मार्गाने प्रभण करीत गांधी चौक येथे सभा घेण्यात आली. यावेळी सभेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध महत्वाच्या मुद्द्यावर आपले मत मांडले.
एक देश एक निवडणुक ह्या मुद्दावर बोलताना ते म्हणाले कि, देशात एक देश एक निवडणुकीचे कॉंग्रेस समर्थनच करणार.संविधानात व्यक्तिमत्वाला आगळा वेगळा महत्व आहे. ईव्हीएम मशीन बाबतचा संभ्रम दुर केला पाहीजेत. जगाच्या पाठीवर आज सर्वच देशात बॅलेट पेपरवर निवडणुका होतात.
सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यावर भाष्य करताना पटोले म्हणाले, मराठा आरक्षण देण्याचे अधिकार राज्याचे नाही.आता केंद्राचे विशेष अधिवेशन आहे. राज्यातील भाजपचे नेते व मुख्यमंत्री यांनी केंद्राला ५० टक्के आरक्षणाची मर्याठा उठविण्याची मागणी करावी. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत यापुर्वी असा कायदा आणला होता मात्र न्यायालयाने त्याच्यावर चुकीच्या प्रकारे कायदा केल्याचे ताशेरे ओढले होते.
दहीहंडीच्या सणाला भंडारा घटनेत गालबोट लागले. दही हंडी कार्यक्रमात टॉवर कोसळुन आठ ते दहा गोविंदा जखमी झाले होते.मात्र या प्रकरणात गुन्हा नोंद व्हायला हवा पोलीसांनी तसे केले नसल्यास आपण त्याची दखल घेवु. कायदा हा सर्वांसाठी सारखाच असतो. असे त्यांनी वक्तव्य केले.
केंद्राकडून महाराष्ट्रासाठी जी सूत्रे हलवली जात आहेत त्याबाबत बोलताना पटोले म्हणाले कि, मुंबईला केंद्रशासित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. केंद्राच्या पाच दिवसाच्या अधिवेशात मुंबई वेगळे करण्याचा प्रयत्न होवु शकतो. केंद्राचे हे विशेष अधिवेशन देशाची काय राखरांगोळी करून जाईल हे आताच सांगता येणार नाही.