नेशन न्यूज मराठी टिम.
कल्याण/प्रतिनिधी– एका महिलेला स्कायवॉकवर प्रसूती वेदना सुरु झाल्या. तेव्हा नागरीकांनी हे पाहून या संदर्भातील माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली. महिलेला हमालांच्या मदतीने तातडीने रुक्मीणीबाई रुग्णालयात आणले. मात्र या महिलेला रुग्णालयात दाखल करुण घेन्यास कर्मचार्यानी नकार दिला. तेव्हा पोलिसांनी त्यांना विनंती केली. त्यांची विनंती कर्मचार्यानी मानली नाही. अखेर महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या दारात झाली.या घटनेच्या चौकशीचे आदेश प्रशासना कडून देण्यात आले आहेत.
रूक्मिणीबाई हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर प्रसूती झाली. या घटनेच्या विरोधात सर्व थरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी मनसे आमदार राजू पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या आयुक्तांच्या नावापुढे डॉक्टर,आपले खासदार डॉक्टर पण आजून यांना लोकांच्या नडीची नस सापडली नाही असा खोचक टोला यावेळी प्रशासन व येथील लोक प्रतिनिधींना लगावला आहे.एका महिला भगिनीची प्रसूती बाहेर सार्वजनिक ठिकाणी होणे ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. असेही पुढे ते म्हणाले.
त्याच प्रमाणे जर या प्रकरणी कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईलने तिथे जाऊन जाब विचारणार असल्याचा इशारही यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी यावेळी दिला आहे.त्याच बरोबर ही घटना माणुसकीला काळींबा फासणारी असून यात राजकारण करण्यासारखे काहीच नाही असेही यावेळी त्यांनी सांगितले.अशा घटना घडून सुद्धा ते सुधारणार नसतील तर एक इथला नागरिक म्हणून , पक्षाचा एक स्थानिक पदाधिकारी म्हणून आम्ही त्यांना जाब विचारूच असे ठाम पणे आमदार राजू पाटील यांनी यावेळी सांगितले.