नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर / प्रतिनिधी – मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये किंव्हा त्यांना ओबीसी मध्ये शामिल करू नये, या मागणी साठी ओबीसी-कुणबी समाज कृती समितिचे आज पासून नागपूरात बेमुदत धरणे आंदोलनला सुरुवात करण्यात आली असून या आंदोलनात महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सुद्धा शामिल झाले.
या आंदोलनात विरोधी पक्षनेते यानी स्टेज वर न जाता खाली लोकांमध्ये बसले. वडेट्टीवार म्हणाले की, मी या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आलो आहे आणि हे ओबीसी जनतेचे आंदोलन आहे. म्हणून याला राजकीय वळण लागल नाही पाहिजे, यासाठी मी स्टेजवर न जाता जनते सोबत बसलो आहे. माझा या आंदोलनाला पाठिंबा राहील अशी, ग्वाही वडेट्टीवार यांनी दिली आहे.