नेशन न्यूज मराठी टीम.
अकोला / प्रतिनिधी – मराठा समाज आरक्षण प्रश्नी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील ह्यांना पाठिंबा देत, जालना येथील घटनेच्या निषेधार्थ मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज अकोला जिल्हा बंदची हाक दिली आहे.तर सकल मराठ्यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे.
हा मोर्चा स्वराज्य भवन येथून, गांधी रोड, कॉटन मार्केट, दाना बाजार, टिळक रोड, सिटी कोतवाली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार असून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा देण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये सर्व पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला आहे. तर या आंदोलनामध्ये अत्यावश्यक वगळता सर्व बंद असणार आहे, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.