नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – कल्याण पश्चिम स्टेशन परिसरात रात्री गस्ती दरम्यान गुन्हे शोध पथकाचे पो.उप.निरीक्षक तानाजी वाघ व त्यांचे पथकाला कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गावठी बनावटीचे पिस्तूल लावून एक गुन्हेगार येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून मिळाली होती.
या पथकाने स्टेशन परिसरात सापळा रचून उल्हासनगर मध्ये राहणाऱ्या तरुणाला ताब्यात घेत त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडून एक विनापरवाना बेकायदेशीर गावठी पिस्तुल व २ पितळी राउंड मिळाले असल्याने त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ३२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५ गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.