नेशन न्यूज मराठी टीम.
जालना / प्रतिनिधी – जालना जिल्ह्यातील मराठा समाज आरक्षण मुद्द्यावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील हे सध्या चर्चेत आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी राजकीय नेते,सामाजिक कार्यकर्ते अन सामान्य नागरिक देखील येत आहेत, त्यात त्यांच्या काळजीपोटी कुटुंब सदस्य देखील भेटीला येत आहे. त्यांच्या आईने त्यांची भेट घेतली व ह्याप्रसंगी मायलेक दोघांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यापुढे आरक्षणासाठी मराठा समाजाचा एकही मूडदा पडू देणार नाही,हे आंदोलन मराठ्यांच्या कोट्यवधी पोरांचं कल्याण करेल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.मराठ्यांच्या पदरात आरक्षणाचं दान टाकल्याशिवाय शांत बसणार नाही असा विडा मी उचलल्याचं देखील ते म्हणाले.
आज जरांगे पाटलांच्या आईने त्यांची उपोषणस्थळी येऊन भेट घेतली.त्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले.आई व्यासपीठावर दाखल होताच जरांगे यांनी त्यांचे आशीर्वाद घेत गळाभेट घेतली तर यावेळी त्यांच्या आईला देखील हुंदके आवरता आले नाही.उपस्थित असलेल्या महिलांनी त्यांच्या आईला धीर देत त्यांना आधार दिला.माझ्या पोराला न्याय द्यावा,अशी मागणी त्यांनी यावेळी केली.