नेशन न्यूज मराठी टीम.
कोल्हापूर / प्रतिनिधी – भाजप नेत्या पंकजा मुंडे या शिवशक्ती परिक्रमा यात्रेनिमित्त राज्यव्यापी दौऱ्यावर असून त्यांनी कोल्हापुरात श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी आपण देवी चरणी सर्वांना काही ही कमी पडू देऊ नको तसेच कोणाला उपाशी झोपू देऊ नको आणि कोणाला दुसऱ्याच्या दारात जायची वेळ येऊ देऊ नको आणि आपल्या दारात आलेल्या माणसाला रिकाम्या हाती जाऊ देऊ नको, अशी प्रार्थना केल्याचं सांगितलं आहे.
पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा आज कोल्हापुरात दाखल झाली असून त्यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते. त्या सकाळी एका खाजगी हॉटेलमध्ये थांबले होत्या. हॉटेल ते अंबाबाई मंदिर पर्यंत खासदार धैर्यशील माने यांनी पंकजा मुंडे यांच्या गाडीचे साराथ्य केले. पंकजा मुंडे यांनी अंबाबाई चे दर्शन घेऊन माध्यमांशी संवाद ही साधला. मी सध्या शिव शक्ती परिक्रमा यात्रा करत असून ज्योतिर्लिंग आणि साडेतीन शक्तीपीठे यांसह पंढरपूर अक्कलकोट या सर्व ठिकाणी जाऊन दर्शन घेत आहे आणि या यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी जंगी स्वागत होत आहे.
अनेक कार्यकर्त्यांना माझ्याशी संवाद साधायचा आहे हे दिसून येत आहे. ज्या गोष्टी बैठकांमध्ये आणि सर्वांमध्ये बोलता येत नाहीत अशा गोष्टी कार्यकर्ते माझ्याशी बोलत आहेत असे पंकजा मुंडे म्हणाल्या असून या सोबतच कार्यकर्ते हे गेल्या अनेक वर्षांपासून मी मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त करत आहेत मात्र हे काही नवीन नाही असे ते यावेळी म्हणाले आहेत.
काँग्रेस कडून देखील सध्या जनसंवाद यात्रा सुरू असून त्यांची जनसंवाद यात्रा आणि माझी यात्रा ही पूर्णपणे वेगळी आहे त्यांच्या यात्रेत उपस्थित केलेले प्रश्न हे त्यांचे आहेत मी माझ्या स्थानी योग्य आहे आणि याचं मला काहीही वाटत नाही असे म्हणत ऊसतोड कामगारांबाबत देखील त्यांनी भाष्य केलं आहे. ऊसतोड कामगारांचा करार संपला आहे यामुळे ते संपाच्या भूमिकेत आहेत या आणि सरकारची परिस्थिती पाहता कारखानदारांनी योग्य भूमिका घ्यावी असेही मुंडे यावेळी म्हणाल्या आहेत.