नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – कल्याण मध्ये राजकीय दहीहंडींच्या चढाओढीमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार
आहे. सहजानंद चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अंतर ३०० मीटर एवढ्या परिसरात चार दहिहंडी उत्सव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कल्याण पूर्व आणि पश्चिम भागाचा संपर्क तुटणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिंदे गटाची दहीहंडी साजरी होणार तर दुसरीकडे कल्याण मधील गुरुदेव हॉटेल जवळ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची दहीहंडी साजरी होणार आहे तर सहजानंद येथे भारतीय जनता पार्टीसह भाजप समर्थकांची दहीहंडी साजरी होणार या चारही दहीहंडीमुळे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होणार असल्याने या वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे
या रस्त्यांवर मॉल मार्केट रुग्णालय असल्यामुळे ॲम्बुलन्स सह सर्वसामान्य नागरिकांना या वाहतुकीला सामोरे जावे लागणार आहे त्यात निवडणुकीच्या वारे वाहू लागल्याने दहिहंडी उत्सव प्रतिष्ठेचा राजकीय पक्षांनी केला आहे .त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनाचा जाम आणि नागरीकांना रस्ता काढताना तारेवरची कसरत करावी लागेल