नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी – देशातील अक्षय ऊर्जा वाढीला चालना देण्यासाठी आणखी एक पाऊल उचलत इरेडा अर्थात भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था लिमिटेडने 5 सप्टेंबर 2023 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा सोबत सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. हे करार इरेडाला युनिअन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया सोबत सह-कर्ज आणि कर्ज सिंडिकेशनमध्ये (मोठया प्रमाणावरील व्यवहारांच्या व्यवस्थापनासाठी तात्पुरती समन्वय प्रक्रिया), प्रस्थापित आणि उदयोन्मुख अक्षय ऊर्जा तंत्रज्ञानासह, नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांच्या विस्तृत साखळीसाठी सहकार्य करण्यास सक्षम करतील.
या भागीदारीबद्दल इरेडाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास यांनी आनंद व्यक्त केला. “युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा या दोन्ही बँकांकडे शाखांचे देशव्यापी विस्तृत जाळे आहे. या सहकार्याचा उद्देश विशेषत: दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणींमधली शहरे आणि ग्रामीण भागात विस्तार करत विद्यमान आणि नवीन ग्राहकांना अद्वितीय आणि नवोन्मेषी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यास सक्षम होणे, हा आहे. आमची क्षमता आणि संसाधने यांचे संयोजन करून आम्ही पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत आणि शाश्वत विकास या संकल्पा अनुरूप आमच्या ग्राहकांना सेवा देत राहू, असा विश्वास आम्हाला आहे.
अलिकडच्या वर्षांत, इरेडा अक्षय ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी आपल्या तांत्रिक-आर्थिक कौशल्याचा लाभ देण्यासाठी विविध केंद्रीय आणि राज्य संस्थांसोबत तसेच वित्तीय संस्थांसोबत भागीदारी करण्यास सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे.
- September 6, 2023