नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे/प्रतिनिधी – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले होते. आंदोलन सुरु केल्यानंतर मुख्यमंत्री यांनी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्याशी संपर्क करून उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली होती. मात्र, त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. प्रकृती खालावल्यामुळे पोलीस मनोज जरांगे यांना उपचारासाठी घेवून जात असतांना आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या अमानुष लाठीचार्जचा जाहीर निषेध धुळे जिल्हा एम.आय.एम. च्या वतीने करण्यात येत आहे. असे एमआयएम कडून यावेळी सांगण्यात आले.
सर्व घटनाक्रम लक्षात घेता पोलीस प्रशासनाने गंभीर चुक केल्याचे दिसून येते. मराठा मोर्चाचे कार्यकर्ते दि.२९ ऑगस्ट पासून शांततेने आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करीत असताना पोलीस प्रशासनाने त्याच दिवशी मोठा फौजफाटा गोळा करून ठेवला आणि अंतरवाली सराटीचा इतर गावांशी संपर्क तोडण्यात आला. महाविकास आघाडीचे सरकार असतांना आमचे सरकार येवू द्या, फक्त दोन महिन्यात मराठा आरक्षण देतो, असे म्हणणारे भाजपाचे नेते सत्ता हातात येवून सव्वा चार वर्ष झाले तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकले नाही. हे अपयश झाकण्यासाठी तर आंदोलन चिरडण्याचा सरकारचा प्रयत्न नाही ना? असा सवाल या एम.आय.एम पक्षाने केला आहे.
यावेळी आंदोलनादरम्यान धुळे मनपाचे नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक युसुफ मुल्ला, नगरसेवक गनी डॉलर नगरसेवक सईद बेग मिर्झा, नगरसेवक मुकतारअन्सार, डॉ. दीपश्री नाईक, फातेमा अन्सारी रफिक शाह, आमीर पठाण अकिब अली आदी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.