नेशन न्यूज मराठी टीम.
जालना / प्रतिनिधी – मराठा क्रांती मोर्चा लाठीचार्ज प्रकरणी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत अमित ठाकरे यांच्यासह मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.तेव्हा त्यांनी या घटनेचा निषेध करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
राज ठाकरे म्हणाले कि, हे सगळे राजकारणी लोक तुमचा फायदा करुन घेत आहेत. चांगली मत पाडून घेतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. काही गोष्टी कायद्याने देखील समजून घ्या. परंतु हे सतत तुम्हाला जातीचं आणि आरक्षणाचं आमीष दाखवून कधी हे सत्तेत तर कधी विरोधात येतात. विरोधीपक्ष मोर्चे काढणार आणि मग ते सत्तेत आले की गोळ्या झाडणार.
जेव्हा हे विरोधी पक्षात असतात तेव्हा तुमच्यावर प्रेम असतं आणि सत्तेत गेल्यावर मारायला उठतात. पोलिसांना आदेश कोण देत आहे त्यांना दोष द्या. जे वरुन आदेश आले की पोलिसांना ते करावंच लागणार. जे वरुन आदेश आले की पोलिसांना ते करावंच लागणार. येणाऱ्या पिढ्यांना दाखवलं पाहिजे की आमचा राजा कोण होऊन गेला. ज्या लोकांनी तुमच्यावर गोळ्या घालायला लावल्या त्या सर्व लोकांना मराठवाडा बंदी करुन टाका. देवेंद्र फडणवीस जर विरोधी पक्षात असते तर काय केलं असतं? लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. मला या लोकांसारखं खोटं बोलता येत नाही. विषय सुटण्यासारखा असेल तर निश्चित सोडवू. गेंढ्याच्या कातडीच्या लोकांसाठी आपला जीव गमवू नका. असा सल्ला देखील या वेळी त्यांनी नागरिकांना दिला.