महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
राजकीय

सरकारने राजीनामा द्यावा, जनता सरकारला माफ करणार नाही – नाना पटोले

नेशन न्यूज मराठी टिम.

नागपुर/प्रतिनिधी– मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर लाठीचार्ज पोलिसांनी केला आणि त्यानार या घटनेचा राज्यभर निषेध व्यक्त करण्यात आला विरोधी पक्षांनी सरकारला या प्रकरणावरून  चांगलेच धारेवर धरले आहे.यावरून कॉग्रेस पक्षाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. कॉग्रेस प्रदेशध्यक्ष यांनी सरकारवर करमरारीत शब्दात टीका केली आहे  ते म्हणाले की गृहमंत्री यांच्या आदेशाने झालेल्या लाठीचार्जचा निषेध करतो, सुलतानी सरकार आहे, स्वतःसाठी जगणार सरकार आहे, हे लोकशाहीचे खच्चीकरण करण्याचे काम करत आहे, मराठा आणि धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले. त्यावेळी सुप्रीम कोर्टान फटकारल, उपोषण मंडपावर लाठीचार्ज होणं, हे दुर्दैवी आहे, पहिल्यांदा महाराष्ट्रात झाल आहे.असेही ते म्हणाले 

राहुल गांधी यांची जोरदार भाषण होत असताना लाठीचार्ज करण्याचे पाप केले.लहान मुलांवर लाठीचार्ज झाला, आमिष देऊन मराठा समाजावार लाठीचार्ज केला, स्वतः सरकारने राजीनामे दिले पाहिजे, महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही.महाराष्ट्राची संस्कृती संपवण्यासाठी प्रयत्न सरकार करत आहे. हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. असेही ते म्हणाले 

यात मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कॉंग्रेस भूमिका निभावेल, राष्ट्रीय जनगणना करून घेण्याची मागणी केली, बदमाश वृत्तीचे लोक सत्तेत बसले आहेत, यांना बाहेर काढण्याचा संकल्प घेईल, हे सरकारं स्वतः भ्रष्टाचार करून परिवार वाद करण्याचा आरोप कॉंग्रेसवर करत आहेत. इंडिआ आघाडीची बैठक असल्यानं प्रयत्न अयशस्वी करण्यासाठी हे केले. 24 तासात आरक्षण आणून देण्याची फडणवीस बतावणी करत होते. असे बोलत त्यानी फडणवीस यांच्यावर सुद्धा टिका केली.

उलट्या चोराच्या बोंबा आहेत, फडणवीस सांगत होते, आम्ही बिल माफ करू, आता दीड वर्ष लोटून काहीच केले नाही.हे मंत्रिमंडळ विस्तार करू शकले नाही, भाजप सत्तेत बसून राजकारण करत आहे.कॉंग्रेस आगीत तेल टाकण्याची काम काँग्रेस करत नाही, तर भाजपचे हे काम आहे, तेल टाकणारे लोक सत्तेत बसले आहे.असा आरोप यावेळी विरोधकावर त्यांनी केला.

सरकार ने त्या  ठिकाणी लाठीचार्ज केला त्या ठिकाणी  शरद पवार जात आहेत, यात निर्दोष लोकांवर लाठीचार्ज झाला, बसेस जाळल्या जात आहेत, सरकारच्या तानाशाही प्रवृत्तीच पाप जनता भोगत आहे.असाही आरोप त्यांनी केला.

 केंद्र सरकारच्या विशेष अधिवेशनावर बोलताना नाना पाटोलेनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला,नियमित अधिवेशन आताच संपलं. पंतप्रधान यांच्याकडे मणिपूरवर बोलण्यासाठी वेळ नाही. आता अधिवेशन बोलवत आहेत. जुमलेबाज सरकार आहे, वेळेवर काहीही करतील, निवडणुका लावतील, लोकांनी यावर विश्वास ठेवू नये, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न पडले आहे, दुष्काळ परिस्थिती असताना केंद्रातील सरकार यावर बोलायला तयार नाही, जुमलेबाज सरकार आहे. 

भारत भारत आहे, हा शब्द कुठला आहे, मूळ मुद्याला दुर्लक्ष करत असेल तर त्यावर चर्चाच करायची गरज नाही. पाकिस्तानचे लोक हिंदुस्तान म्हणतात, मोहन भागवत हिंदुस्थान म्हणत आहे. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली

कॉग्रेसच्या पदयात्रे बद्दल बोलताना ते म्हणाले आष्टी शहिद येथून पदयात्रेची सुरवात करत आहे. राज्यातील विविध स्थळी ही यात्रा सुरू करत आहे. जुमलेबाज सरकार आहे, तरुणांना फसवलं, सर्वसामान्य लोकांचं जगन मुश्किल केल, यात्रेला जनतेचा प्रतिसाद आहे.मी 22 ते 24 किलोमीटर रोज चालणार आहे. 3 ते 12 दिवस ही यात्रा आहे. नवरात्री नंतर दुसरी यात्रा होईल.

एक देश एक निवडणूक यावर बोलताना नानांनी सरकार चांगलेच धारेवर धरले मला असं वाटत की, समर्थन करण्यास हरकत नाही. पण निष्पक्षपातीपणे निवडणुका झाल्या पाहिजेत, जातीपातीवर मतदान व्हावे, बॅलेटवर निवडणुका व्हाव्या, लोकशाहीचा खून हे सरकार करत आहे, गळा कापण्याचे पाप हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×