नेशन न्यूज मराठी टीम.
नंदुरबार / प्रतिनिधी – जालना जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने आमरण उपोषण करण्यात येत होतं या उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यामुळे त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रा सोबत नंदुरबार जिल्ह्यात देखील दिसून येत आहेत.
पोलिस व सरकारच्या विरोधात आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नंदुरबार शहरातील जगतापवाडी चौफुली परिसरात निषेध आंदोलन करण्यात आला, सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली आहे परंतु अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्यामुळे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येत होते. परंतु सरकार दडपशाही करत असून आंदोलकांवर अन्याय अत्याचार करत आहे त्यामुळे काल जालना जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर हा अमानुस लाठीचार्ज करण्यात आला आहेत त्यामुळे आज नंदुरबार जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आला आहे.
तर प्रशासनाकडून देखील खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेस देखील आज बंद ठेवण्यात आल्या आहेत तर कुठलाही अनुचित प्रकार घडवून यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला असल्याचे दिसून येत आहे.