नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे / प्रतिनिधी – धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनाच्या वतीने धुळे शहरातील क्यूमाईन क्लब समोर गंगाधर कोळेकर यांच्या नेतृत्वात एक दिवशी धरणे आंदोलन करण्यात आले. हमाल कामगार समितीच्या वतीने बऱ्याच वेळेस साक्री, पिंपळनेर, मोराणे येथे माथाडी कायदा लागू करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे व मोर्चा काढला आहे. परंतु सदर ठिकाणी माथाडी कायदा लागला नाही. त्यामुळे आज धरणे आंदोलने हत्त्यार उपसण्यात आले.
यावेळी समितीचे गंगाधर कोळेकर यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाने देखील खाजगी बाजार समिती मध्ये माथाडी कायदा लावण्याबाबत आदेश पारीत केले आहे. तरी साक्री, पिंपळनेर, मोराणे येथील व्यापारी हे आदेशाची पायमल्ली करीत आहे. तसेच मोराणे येथे सुद्धा अद्याप माथाडी कायदा लागला नाही. तेथील व्यापारी देखील उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहेत. तसेच कायद्याप्रमाणे संपूर्ण जामवाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. अन्यथा येणाऱ्या
काळात आणि यापेक्षा ही तीव्र आंदोलन करू व या आंदोलनात जे काही होईल याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल असा गंभीर इशारा यावेळी देण्यात आला.