नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – नेहमीच आपल्या विविध वक्तव्याने चर्चेत असलेल्या सुषमा अंधारे ह्यांनी नुकतेच एक जाहीर वक्तव्यात वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण दिले होते असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर शमिभा पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य, वंचित बहुजन युवक आघाडी यांनी आपले मत व्यक्त करत अंधारे यांना सवाल केला आहे.
शामिभा म्हणाल्या कि, कोणतीही बैठक असो, राजकीय घडामोडी किंवा चर्चा असतील तर त्यामध्ये पक्ष म्हणून एक अधिकृत निमंत्रण येणे गरजेचे असते. ते अधिकृत निमंत्रण इंडिया आघाडीने चर्चेसाठी वंचित बहुजन आघाडीला कोणाच्या हाती पाठवल आहे? याची नैतिक जबाबदारी घेत आपण जर स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल. सुषमा अंधारे तुमचा राजकीय बैठकींना जाण्याचा अनुभव केवढा आहे, हे मला माहीत नाही. अशाप्रकारे अधिकृत निमंत्रण असल्याशिवाय असल्या चर्चांमध्ये सहभागी होता येत नाही. नाहीतर असं होईल “ताई आली आणि येऊन बसली”.
वंचित बहुजन आघाडी ही भाजपा विरुद्ध आहे. भाजपा विरुद्ध लढण्यासाठी तयार आहे. पण अशाप्रकारे वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीच्या बैठकीत बोलावलं गेलेलं नाही आहे. असे शामिभा म्हणाल्या.