नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक / प्रतिनिधी – चांदवड आग्रा महामार्गावर एकाच वेळेस दोन वेगळ्या गाड्यांचे अपघात झाले. त्यात युपी 25 सी टी ८४७० ही ट्रक रद्दी पेपरने भरून चांदवड बाजूकडून मालेगावकडे जात असताना चांदवड तालुक्यातील राहुड घाट उतरताना ट्रक चालकांचे गाडी चालवताना नियंत्रण सुटल्याने गाडी बाजुच्या डिवाईडर वर जाऊन पलटी झाली. त्यात चालकाच्या पायास जबर मार लागल्याने त्यास तात्काळ सोमा टोल कंपनीने चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले आहे.
त्यानंतर दहा मिनिटातच दुसरा अपघात त्याच ट्रकच्या समोर शंभर फुटाच्या अंतरावर इको कार नंबर एम एच 15 जी एक्स 3576 ही देखील चांदवड बाजू कडून मालेगाव कडे जात असताना तिला पाठीमागून मालवाहतूक टेलर आर जे 01 जी बी 49 22 या वाहतूक टेलरने पाठीमागून ठोकर मारल्याने इको कार मधील महिला सुगंधा काटे वय 42 राहणार नासिक ह्या देखील गंभीर जखमी झाल्या असून त्यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे औषध उपचारासाठी पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.