नेशन न्यूज मराठी टीम.
भंडारा / प्रतिनिधी – दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. हा सण भाऊ बहिणीच्या प्रेमाचा असतो. रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधून आयुष्यभर रक्षण आणि प्रेमाने राहण्याची अपेक्षा करते. मात्र, या सर्व प्रकाराला बगल देत भंडाऱ्यातील ओबीसी क्रांती मोर्चा महिला संघटनेच्या वतीने आज ओबीसी क्रांती मोर्चा महिला आघाडी तर्फे खड्ड्यातील रस्त्यांना राखी बांधून व पूजन करुन अनोखे आंदोलन करण्यात आले.
शहरातील शितला माता मंदिर आणि खांब तलाव चौकातील खड्ड्यांमुळे कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. तर दररोज छोटे मोठे किरकोळ अपघात होऊन अनेक लोकांना अपंगत्व आले असून तरी सुद्धा प्रशासन जागे झाले नसल्यामुळे आमदार, खासदार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी क्रांती मोर्चा महिला संघटनेच्या वतीने चौकातील खड्डे असलेल्या ठिकाणी त्या खड्ड्यावर पाणी टाकून पूजा करून चक्क राखी बांधून त्या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे जीव धोक्यात घालून या रस्त्याने प्रवास करीत असतांना कोणत्या प्रकारचे अपघात घडू नको आणि माझ्या भावांना माझ्या परिवाराला सुखकर प्रवास होऊन दे असे खड्ड्याला मागणे ओबीसी क्रांती मोर्चा संघटनेच्या महिलांनी केले आहे.