नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर / प्रतिनिधी – बेरोजगार तरुणांची स्थिती सध्या फारच दयनीय झालेली दिसून येते. नोकरीच्या शोधार्थ जाहिरातीला प्रतिसाद देत शासकीय नोकरीची स्वप्न पाहून अर्ज केले जातात. ह्या शासकीय पद भरतीत अर्जाची किंमत दिवसेदिवस वाढताना’ दिसते. यावर राजकीय पक्ष आंदोलन करून आपला निषेध व्यक्त करत प्रतिक्रिया देत आहेत. असेच अनोखे आंदोलन आम आदमी पार्टी यांनी संभाजीनगर येथे केले व त्यानिमित्ताने आपले म्हणणे मांडले.
सध्या विविध शासकीय पदांची भरती सुरू केली मात्र युतीसरकारने बेरोजगार तरुण आणि तरुणींना लुबाडण्याचा काम करत आहेत. सेवा भरतीतील परीक्षा शुल्क 900 ते 1000 रुपये घेऊन लुबाडत आहेत. यूपीएससीचे परीक्षा शुल्क 100 ते 150 रुपये असते मात्र तलाठी व तत्सम गट कवडे पदाकरिता एवढा परीक्षा शुल्क घेऊन शासन बेरोजगार सुशिक्षितांना जाणून-बुजून वंचित ठेवत आहेत. म्हणून आम आदमी पक्ष या आंदोलनातून भीक मागून जमा होणारा पैसा सरकारला पाठवणार आहे अशी माहिती आपचे युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष सतीश देवेंद्र लोखंडे यांनी दिली.