नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – ब्रिटीश काळामध्ये स्थापन झालेले मुंबईचे के.ई.एम रुग्णालय आरोग्य क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावताना आपण पहिले आहे. अद्ययावत यंत्रणा व अत्याधुनिक सोयीसुविधानेयुक्त असे हे सरकारी रुग्णालय मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने, असह्य आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी आशेचा किरण आहे. अत्यंत जुजबी किमतीत इथे शस्त्रक्रिया केल्या जातात. तरी हे रुग्णालय सध्या चर्चेत आहे.
के.ई.एम रुग्णालय मध्ये अनेक समस्या आहेत काही एम.आर.आय, सिटीस्कॅन , एक्स-रे इत्यादी या मशीन कमी प्रमाणात उपलब्ध आहेत त्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे त्याचा निषेध म्हणून शिवसेना ठाकरे गट आक्रमक होऊन रुग्णालय बाहेर खा. अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत आंदोलन सुरु आहे.