नेशन न्यूज मराठी टीम.
संभाजीनगर / प्रतिनिधी – संभाजीनगर येथे आदर्श नागरिक सहकारी पतसंस्थांच्या सदस्यांनी आपले हक्काचे पैसे पतसंस्थेने द्यावे ह्यासंदर्भात पतसंस्था प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केली होती. ह्या कष्टकरी ठेवीदारांच्या प्रश्नांकडे गेल्या सहा महिन्यांपासून आदर्श नागरिक सहकारी पतसंस्थांचे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे सदस्य आंदोलन करून पवित्रा घेत आहेत.
पतसंस्था सदस्यांना त्यांचे पैसे मिळत नसल्यामुळे झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आज डी डी आर ऑफिस समोर थाळी आंदोलन करण्यात आले. आमचे पैसे आम्हाला लवकर परत मिळावे अशी मागणी सदस्य करत आहेत. आणि जोपर्यंत या कष्टकऱ्यांचे पैसे परत मिळत नाही तोपर्यंत असे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सदस्यांनी सांगितले.