महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी महाराष्ट्र

श्रीरामपूर मधील पीडित कुटुंबियांची ॲड. प्रकाश आंबेडकरांनी केली फोनद्वारे विचारपूस!

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई / प्रतिनिधी – अहमदनगर जिल्ह्यातील, श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे काल धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 3 बौद्ध तरुणांनी कबुतरं, शेळी चोरल्याच्या संशयावरून गावातील धनदांडग्या लोकांनी अमानुषपणे मारहाण केली. त्यातील एका अल्पवयीन मुलाच्या अंगावर लघवी केली, त्याला थुंकी चाटायला लावली, कपडे काढून झाडाला लटकावून बेदम मारहाण केली, व बाहेर कोणाला सांगू नका अन्यथा जीवे मारू अशी धमकी आरोपींनी पीडितांना दिली. अशी माहिती पीडितांनी बाळासाहेब आंबेडकर यांना दिली.

पीडित तरुणांना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पीडित तरुणाची फोनवरून विचारपूस करून त्याला धीर दिला. यावेळी पीडित तरुणांच्या आजीशी ही त्यांनी संवाद साधला व मदतीचे आश्वासन दिले. 

यावेळी पीडित महिलेने ॲड. आंबेडकर यांना साद घालून न्याय मिळवून देण्याची विनंती केली. त्यावर १ सप्टेंबर रोजी ते स्वतः पीडित परिवाराच्या भेटीला येत असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व घटनेचा व्हिडीओ ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केला आहे.

“हा जातीय अत्याचारच आहे आणि तो जातीयवादी मानसिकतेतून घडलेला आहे. तीन दलित मुलांना ‘शिक्षा’ देण्याचा अधिकार आपल्याला आहे ही मानसिकता इथल्या जातीय व्यवस्थेनेच जोपासली आहे. इतर कोणाला कबुतर चोरीच्या संशयावरून इतकी अमानुष मारहाण झाली असती ?? निश्चितच नाही”!  असेही एक ट्विट करत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपला संताप व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×