नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – मोहने परिसरातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांना घेऊन बहुजन समाज पार्टीच्या शिष्ट मंडळाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेत ज्वलंत प्रश्न मांडले. यात प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ. प्रशांत इंगळे, ठाणे जिल्हा सचिव विनोद भालेराव, ठाणे जिल्हा प्रभारी सुनील मडके, कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष प्रदीप सोनावणे, कल्याण पश्चिम विधानसभा महासचिव भिमराव खेत्रे, मोहोने शहर अध्यक्ष श्रीकांत साळवे, वॉर्ड क्र.१२ अध्यक्ष बाळु भोसले, वैभव कांबळे यांनी विविध मुद्दे उपस्थित केले.
‘अ’ प्रभाग क्षेत्र येथे कार्यरत असलेले इंजिनिअर बोरसे तसेच परिमंडळ १ चे उपायुक्त धैर्यशील जाधव यांच्यावर दफ्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी. ‘अ’प्रभाग क्षेत्र येथिल वॉर्ड क्र. १४ मधील लहुजी नगर येथील नगरिकासाठी तत्काळ शौचालय बांधून द्यावे. अ’ प्रभाग क्षेत्रात असलेल्या मोहोने रोडवरील अनधिकृत बांधलेले अनधिकृत स्मारक तात्काळ जमिनदोस्त करण्यात यावे. अरुंद रस्ते व चिंचोळ्या गल्ल्यामध्ये घंटागाडी जात नसल्याने स्वच्छता दुत पाठवणे.
मोहोने परीसरातील सर्व सार्वजनिक सौचालयांमध्ये दुरुस्ती तसेच विज व पाणी, स्वच्छता यांची व्यवस्था करणे. आदी मागण्या यावेळी आयुक्तांकडे मांडण्यात आल्या. या सर्व मागण्यांवर आयुक्तांनी त्वरीत कारवाई करण्याचे मान्य करुन तसे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले.