नेशन न्यूज मराठी टीम.
पुणे / प्रतिनिधी – गुप्त माहितीच्या आधारे, महसूल गुप्तचर विभाग (डीआरआय ), पुणे प्रादेशिक युनिट, पुणे यांच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पुणे येथे तेलंगणा इथे नोंदणी असलेली एक मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर मोटार अडवली.वाहनाची सविस्तर तपासणी केली असता त्यात पांढरे स्फटिक असलेले चार निळ्या रंगाचे प्लास्टिकचे कंटेनर असल्याचे आढळून आले. प्राथमिक क्षेत्रीय चाचण्यांनी यातील पदार्थ मेथाक्वालोन असल्याचे सूचित झाले,एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदी अंतर्गत हा एक सायकोट्रॉपिक म्हणजेच मनावर विपरीत परिणाम करणारा पदार्थ आहे .या वाहनासह नमूद केलेला 101.31 किलोग्रॅम ज्याची किंमत 50.65 कोटी रुपये (अंदाजे) असलेला कथित बेकायदेशीर पदार्थ मेथाक्वॉलोन , एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदीनुसार डीआरआयने जप्त केले आहे.
या प्रकरणी तेलंगणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणा येथील रहिवासी असलेल्या पाच जणांना एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे.. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, अटक करण्यात आलेले लोक बेकायदेशीर विक्री आणि/किंवा सायकोट्रॉपिक पदार्थांची खरेदी, वाहतूक आणि निर्यात करण्यात गुंतलेले होते आणि या टोळ्या भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या असू शकतात आणि त्यांचे परदेशातही संबंध असू शकतात. .याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
महसूल गुप्तचर संचालनालय ही एक प्रमुख संस्था आहे जी आयात निर्यातीमधील फसवणुकीविरोधात तसेच तस्करी आणि अंमली पदार्थाना चाप लावण्यासाठी कार्य करते.