महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ठाणे लोकप्रिय बातम्या

भेसळीसाठी साठविलेला २ कोटी २४ लाखाचा लवंग कांडीचा साठा एफडीएने केला जप्त

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे/प्रतिनिधी अन्न व औषध प्रशासनास प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मे. रिषी कोल्ड स्टोरेज, तुर्भे एमआयडीसी येथे अन्न सुरक्षा व मानद कायदा 2006 अंतर्गत तपासणी केली असता, तेथील कोल्ड स्टोरेजमध्ये हलक्या दर्जाचे मसाले पावडर व लवंग पावडर तयार करण्यासाठी व लवंगमध्ये भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लवंग कांडीचा मोठ्या प्रमाणात साठा केलेला आढळला. तपासणीनंतर लवंग कांडीचा 160111 किलोचा साठा जप्त करण्यात आला असून जप्त लवंग कांडीच्या साठ्याची एकूण किंमत 2 कोटी 24 लाख 15 हजार 540 रुपये इतकी आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.

जप्त केलेला साठा मे. जी. टी. इंडिया प्रा. ली., शॉप नं. बी-५१, एपीएमसी मार्केट, वाशी या आस्थापनेचा असल्याचे उघडकीस आले. हा साठा अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींचा भंग करणारा असल्याचे आढळून आले. या साठ्यातून एकूण 07 लवंग कांडीचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले आहेत. अन्न नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असून सदर अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनी विभागाचा कार्यभार घेताच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून अन्न पदार्थाच्या भेसळीच्या अनुषंगाने कडक कारवाई घेण्याचे आदेश नुकतेच दिलेले होते. त्यानुसार प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या निर्देशानुसार सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार व कोकण विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (दक्षता/गुप्तवार्ता) उल्हास इंगवले, अन्न सुरक्षा अधिकारी अरविंदकुमार खडके, राहुल ताकाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×