नेशन न्यूज मराठी टिम.
जळगाव/प्रतिनिधी– जळगाव जिल्ह्यातील तलाठी परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना सर्वर डाउन चा फटका बसला आहे.सर्व्हर डाउन असल्यामुळे तब्बल दोन तासपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे बाहेर जिल्ह्यातून आलेला विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असून विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. जळगाव शहरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी सकाळी नऊ वाजता तलाठी भरती चा पहिला पेपर होता. मात्र सर्व्हर झाल्यामुळे हा पेपर साडेअकरा वाजता सुरू झाला. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता ज्या उमेदवारांचा पेपर होता त्यांची दुपारी अडीच वाजता परीक्षा होणार.
दरम्यान परीक्षेसाठी नंदुरबार तसेच जळगाव मध्य प्रदेश सीमेवरील तसेच विविध जिल्ह्यांमधून विद्यार्थी हे वेळेवर दाखल झाले.मात्र या ठिकाणी त्यांना सर्व्हर डाउन ची अडचण सांगून पेपर उशिराने सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.सर्व्हर डाउन मुळे तब्बल दोन तास ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे रात्री साडेआठ वाजेपर्यंत या परीक्षा सुरू राहणार आहे.या परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कुठलीही बसण्याची व्यवस्था नसल्याने उमेदवारांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे तसेच आमचा जो वेळ वाया गेला याला जबाबदार कोण असाही प्रश्न या ठिकाणी तरुण तरुणी तसेच परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांनी उपस्थित केला आहे आहे.
एक विवाहितेचा तर चक्क परीक्षेसाठी येत असताना रस्त्यात अपघात झाला मात्र यानंतरही अपघातग्रस्त चार चाकी जागेवरच सोडून दुसऱ्याची दुचाकी घेऊन त्या या ठिकाणी वेळेवर पोहोचल्या मात्र आता त्यांना या ठिकाणी तब्बल दोन तास उशिराने पेपर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आल्याने यावेळी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.