नेशन न्यूज मराठी टीम.
औरंगाबाद / प्रतिनिधी – जाती विहीन नवसमाज रचनेच्या निर्मितीसाठी ज्यांनी आंतरजातीय – आंतरधर्मीय विवाह केलेला आहे ,अश्या घटना नव्या राष्ट्र निर्मितीचा पायाभरणी करणारी मानावी लागेल. हे धाडस समाजाच्या प्रवाहाविरुद्ध जाणारे असले तरी ते मानवतेच्या दृष्टीने अत्यंत गौरवास्पद आहे. म्हणून होल्डिंग हॅन्ड्स, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व सेंटर टू प्रमोट हार्मोनी अँड ब्रदरहूड यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरजातीय – आंतरधर्मीय जोडप्यांचा सत्कार महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधी भवन समर्थ नगर येथे करण्यात आले. यावेळी मंगला खिवंसरा, जेष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ. ऋषिकेश कांबळे, जेष्ठ लेखक डॉ. शेषराव चव्हाण, वरिष्ठ पत्रकार स. सो. खंडाळकर, पूर्व न्यायाधीश डी आर शेळके, महात्मा गांधी स्मारक निधीचे कार्याध्यक्ष डॉ मच्छिंद्र गोर्डे, होल्डिंग हँड्सचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सिरसीकर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
जोडप्यांमध्ये वैचारिक मत भिन्नता असली तरी मनात दुरावा नसावा असे प्रतिपादन मंगला खिवंसरा केले तर शासन जरी आंतरजातीय – आंतरधर्मीय विवाहास प्रोत्साहन देत असले तरी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना शासनाकडून लवकर निधी उपलब्ध होत नाही, असे प्रतिपादन स सो खंडाळकर यांनी केले. यावेळी पाहुण्यांचे स्वागत आणि आभार होल्डिंग हँड्सचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सिरसीकर यांनी केले तर महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे कार्याध्यक्ष डॉ मच्छिंद्र गोर्डे यांनी प्रास्तविक केले.
यावेळी प्रशांत सूर्यवंशी, प्रेमसागर चांद्रमोरे, सुचिता चंद्रमोरे, प्रमिला कुलकर्णी, संदीप पाटील, भगवान कापसे, सपकाळ, रोहन गायकवाड, सासणे, प्राची सिरसीकर, ओम शिंदे, पायल शिंदे, कैलाश अतकरे इत्यादींची उपस्थिती होती.